Friday, 26 February 2016

Random thoughts

हा ब्लॉग लिहिताना स्पष्ट  असा काही हेतु किंवा विषय डोक्यात नव्हता. एक मात्र नक्की होते की आयुष्यरूपी प्रवासतील अनेक अनुभव आणि घटननाबद्दल येणारे विचार असे काहीसे ह्याचे स्वरुप असावे . आपल्या आजूबाजुला  गेल्या काही दिवसा मधे असंख्य घटना घडत आहेत . समाजाच्या बंधुता आणि सहनशीलता ह्या मूल्यांचा  ह्रास होताना दिसत आहे .  जेनयू प्रकरणावरून चललेले महाभारत असो, त्यावर राजकारणी लोकांनी केलेले  राजकारण असो किंवा ज्यांच्यावर सत्य सांगण्याची जबाबदारी असते ती  प्रसारमाध्यम ह्यनि चलवलेला पोरखेळ असो हे आपल्यासाठी  नित्याचीच बाब आहे पण ह्यवेली  समाज म्हणून दाखवायची  सामाजिक परिपक्वता आपण दाखवू शकलो नाही  ही वस्तुस्तीति  आहे .
           २-३ वर्षा पूर्वी भ्रष्टाचार , अनागोंदी कारबार ह्याला कंटाळून सुरु ज़हालेल्या "जनलोकपाल " आंदोलन युवा पिढीच्या सक्रिय सहभागाने देशभर आगीच्या वणव्यासारखे पसरले व क्षणार्धात् हयात सत्ताधाऱ्यांचा अहंकार जळून खाक झाला. त्या  वेळची ही युवा पीढ़ी रोजगार , भाववाढ़ , पारदर्शी प्रशासन  मीडिया वर चर्चा करात असे. पण आज जर सोशल मीडिया वरील चर्चिल जाणारे विषय पाहिले तर वाटते की हे च का ते युवा जे भ्रष्टाचारवर  बोलत होते. आज धार्मिक व जातीय विद्वेषी बाबींवर चर्चा होताना दिसते व  हयात सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत.एकीकडे राजकीय जागृती  दिवसेंदिवस वाढत असतानाच सामाजिक व राजकीय असमानता वाढतच जात  आहे. आसे का बर होत  असेल?  समाज हा विविध  परस्पर विरोधी टोळ्यांमधे (धार्मिक , वैचारिक व आर्थिक  आधारावर ) विभागला गेला आहे. आणि कधी  नव्हे एवढी परस्परांबदलची आसुया आणि द्वेष वाढत  चालला आहे. ह्या सर्वांचा कारन जर विचार केला तर लोकशाही हे  आहे. निवडणुकीच्या ह्या  बाजारामधे मतांसाठी चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेतून प्रतेक घटनेचे राजकीय फायदा उठवण्याची वाईट सवय राजकरण्याना लागली त्यामुळे समाजाच्या "अतिराजकीयीकरणाला "(over politicization) प्रारम्भ झाला आहे. ह्या समस्याचे उत्तर पण लोकशाहीतच आहे.  लोकशाहीतील आयुध वापरून विचारवंतांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंंत आपले विचार पोहोचवून लोकांमधे वैचारिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करने गरजेचे आहे. ज्याने करून वैचारिक प्रघल्भ समाजाची निर्मित होईल.